Posts

Showing posts from January, 2022

Proud Moment For India... Indain Lady Vanita Borade Honoured by 11 Countries.

Image
  अंतराष्ट्रीय मॅग्झिन MERI IDENTITY संपादक श्री.शेरसिंह बघेला यांनी 11 देशातून आलेल्या निवडक प्रतिनिधिंच्या उपस्थितीत उदयपूर येथे केंद्रीय गृहमंत्री मा.ना.श्री.अमित शहा यांच्या शुभहस्ते शानदार समारंभात MERI identity चे प्रकाशन करण्यात आले. यामधे जगातील विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची, समाजसेवकांची व प्रभावशाली व्यक्तींची सारांश कार्यपरिचय व माहीती प्रकाशित करण्यात आली आहे. यामधे सर्पमित्र वनिता बोराडे यांचा समावेश करण्यात आला आहे.सर्वांच्या माहीतीसाठी सविनय सादर.

स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती च्या औचित्यावर  सोयरे वनचरे दिनदर्शिकेचे प्रकाशन

Image
 आज दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी विवेकानंद आश्रमात मा. अध्यक्ष श्री.आर.बी. मालपानी सर व उपाध्यक्ष श्री.अशोक थोरहाते, श्री. अनिल मोरे (स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष, लोणार) या मान्यवरांच्या शुभहस्ते सोयरे वनचरे दिनदर्शिकेचे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती औचित्यावर प्रकाशन करण्यात आले. हि दिनदर्शिका सर्प व पर्यावरण विषयक माहीती देणारी असुन यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख विषारी 12 व 40 बिनविषारी साप यासह विषारी घोणस, फुरसे, नाग व मण्यार यांची सविस्तर माहीती असुन अजगर,धामण,मांडोळ, गवत्या ह्या बिनविषारी सापांची सचित्र माहीती आहे. सापांची ओळख,प्रतिबंधात्मक उपाय व प्रथमोपचार ही सर्व माहीती या दिनदर्शिकेत आहे. जगप्रसिद्ध महिला सर्परक्षक, सर्पमित्र वनिता बोराडे यांनी दिनदर्शिका तयार केली असून विवेकानंद आश्रमाचे संस्थापक संजीवन समाधीस्थ संत श्री.स्वामी शुकदास महाराजश्रींना समर्पित केली आहे.  सर्वांसाठी उपयुक्त असणारी सोयरे वनचरे दिनदर्शिका अवश्य संग्रही ठेवावी असे आवाहन सर्पमित्र डी. भास्कर यांनी उपस्थितांना केले. या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष...