स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती च्या औचित्यावर सोयरे वनचरे दिनदर्शिकेचे प्रकाशन
आज दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी विवेकानंद आश्रमात मा. अध्यक्ष श्री.आर.बी. मालपानी सर व उपाध्यक्ष श्री.अशोक थोरहाते, श्री. अनिल मोरे (स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष, लोणार) या मान्यवरांच्या शुभहस्ते सोयरे वनचरे दिनदर्शिकेचे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती औचित्यावर प्रकाशन करण्यात आले. हि दिनदर्शिका सर्प व पर्यावरण विषयक माहीती देणारी असुन यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख विषारी 12 व 40 बिनविषारी साप यासह विषारी घोणस, फुरसे, नाग व मण्यार यांची सविस्तर माहीती असुन अजगर,धामण,मांडोळ, गवत्या ह्या बिनविषारी सापांची सचित्र माहीती आहे. सापांची ओळख,प्रतिबंधात्मक उपाय व प्रथमोपचार ही सर्व माहीती या दिनदर्शिकेत आहे. जगप्रसिद्ध महिला सर्परक्षक, सर्पमित्र वनिता बोराडे यांनी दिनदर्शिका तयार केली असून विवेकानंद आश्रमाचे संस्थापक संजीवन समाधीस्थ संत श्री.स्वामी शुकदास महाराजश्रींना समर्पित केली आहे.
स्वामी विवेकानंद की जय...भारत माता की जय...कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज की जय...!!!_ या जयजयकारात मान्यवरांच्या उपस्थितीत सोयरे वनचरे दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले त्यानंतर उपस्थितांना दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.
Comments
Post a Comment