Posts

Showing posts from August, 2023

सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या नवसंशोधनाने सर्पदंशमृत्यूचा धोका संपणार….!!

Image
सर्पमित्र वनिता बोराडे करणार सर्पदंशमृत्यूचे भय जगातून दूर! भारतामध्ये दरवर्षी अडीच लाख ते साडे सात लाख लोक (2.5 ते 7.5 %) केवळ सर्पदंशामुळे मुत्युमुखी पडतात. सापांविषयीची भिती, अंधश्रद्धा, गैरसमजुती तसेच वैज्ञानिक माहितींचा अभाव व उपचार साधन सामुग्रीची अत्यल्पता प्रतिबंधात्मक व प्रथमोपचारात्मक बाबींचा प्रचार प्रसार लोकाभिमुख न झाल्याने हे सर्पदंश मुत्युचे प्रमाण जागतिक तुलनेत भारतात सर्वाधिक आहे. आपल्या देशात जगातील सर्वात जास्त बिनविषारी साप आढळतात. तरी सुद्धा केवळ अज्ञानामुळे व पारंपारिक आणि गावठी उपचारामुळे लोक दवाखान्यात जाऊन वैद्यकिय उपचार घेताना काही प्रमाणातच दिसून येतात. धार्मिक व घरगुती उपचारात अतिविलंब झाल्याने दवाखान्यात दाखल झालेले रुग्ण डॉक्टरांना उपचार करुन वाचविणे शक्य होत नाही. या हतबल परिस्थितीमुळे नुसता साप दिसताक्षणी लोकांना दरदरुन घाम फुटतो आणि प्रचंड भीतीमुळे जिवाचा थरकाप होतो.सुईच्या टोकाप्रमाणे तीक्ष्ण दात आणि पाण्याच्या थेंबाप्रमाणे असणारे विष हे हत्तीसारख्या प्राण्यांचाही तडकाफडकी जीव घेते, तिथे मानवाची काय गोष्ट! विषारी सर्पदंश म्हणजे साक्षात मुत्यू !! यमा...