सर्पमित्र वानिता बोराडे यांची शेतकरी प्रबोधनासाठी जिल्हा स्तरीय कृषी महोत्सव मेहकर येथे सर्प शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न...
सोयरे वनचरे प्रतिष्ठान द्वारे सर्प शिक्षण-प्रशिक्षण कार्यशाळा राबवून "साप शेतकऱ्यांचा शत्रू नसून मित्र आहे" हा संदेश जिल्हा स्तरीय कृषी महोत्सवातून उपस्थितांना समजाविण्यासाठी सर्प शिक्षण-प्रशिक्षण कार्यशाळा आयोजीत करून सर्पमित्र वनिता बोराडे यांनी सापांची उपयुक्तता प्रत्याक्षिके सादर कारून सर्वांच्या निदर्शनास आणून दिली विषारी बिनविषारी साप कसे ओळखावेत, साप चावला असता काय उपाय करावेत, आपल्या आजूबाजूला साप येऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी, हे अगदी सहजतेने शेतकऱ्यांना समजावून सांगितले. सापबाद्दलची भीती नाहीशी होऊन, प्रिती वाढावी यासाठी शेतकऱ्यांना साप हातात देऊन त्याची वैद्यानिक माहिती हि दिली. खासदार मा.ना.श्री.प्रताप्रावजी जाधव यांनी सुद्धा सापांचा स्पर्श अनुभवला तसेच मा.श्री.माधवरावजी जाधाव सभापती कृ.उ.बा.समिता मेहकर यांनी हि सापांना हाताळले व आपल्या मनातील भीती दूर केली मेहकर विधानसभा मतदार संघाचे चे लोकप्रिय आमदार...