वन्यप्राणी संरक्षणार्थ समर्पित संस्था....... सोयरे वनचरे फाउंडेशन
बालपणापासूनच अनेक चित्र-विचित्र चित्रपटांमध्ये आपण सापांना बघत आलोय,तसेच अनेक भाकडकथा, पुराण कथा, कादंबऱ्या एवढेच काय तर धर्मग्रंथातही आपण सापांविषयी बरेच काही ऐकत आलोय. वैदिक काळापासूनच सापांना धर्मशास्त्रात श्रेष्ठ स्थान प्राप्त असायचे, कारण साप हा शिवजींचा अलंकार होय, पण एवढेच काय तर श्री विष्णू यांचे तर ते प्रिय आसन आहे. जेव्हा साक्षात भगवंताने सापांना एवढे जवळचे स्थान दिले, त्याअर्थी मानवाने सर्पपूजा करणे हे सहाजिकच होते. परंतु आजची सद्यस्थिती बघता हेच दिसून येते की मानवाच्या मनात सापाविषयी शत्रूत्व वृत्तींन चांगले घर केले आहे आणि यामूळेच आज जर कुठही साप आढळला तर, तो जणू काय फक्त आपल्याला चाण्यासाठीच आलाय या समजुतीने माणसं त्याला मारायला धावतात. मग अशा प्रसंगी साप सुद्धा आपल्या विषाचा उपयोग स्वसंरक्षणार्थ करतो आणि याच कारणास्तव आज जास्तीत जास्त सर्पदंश हे सर्पहत्येच्या केलेल्या प्रयत्नांमुळे होतात. ही संकट टळावी म्हणूनच मागील तीस वर्षापासून सर्पमित्र वनिता बोराडे सतत कार्यान्वित आहेत. आज कुठेही साप निघाला तर तिथल्या लोकांना सर्पमित्र वनिता बोराडे यांचा आधार असतो. त्यांच्या या कौशल...