"पर्यावरण हेच प्राणसंजीवन " .......Environment is immortality for Humanity

           





      






                      निसर्ग व पर्यावरणाचा साप हा महत्वपूर्ण घटक असून जैवविविधता अन्नसाखळीत तो संतुलित भुमीका बजावतो.पर्यावरण समतोल राखण्यात सापांचे व वन्यजीवांचे अनन्यसाधारण महत्व आहे . वने, वन्यजीव ,साप, पशू ,पक्षी, व किटक हे आपल्या वसुधैव  कुटूंबकमचे नैसर्गिक जिवन सहचर असून संत तुकाराम महाराज यालाच सोयरे वनचरे असे म्हणतात. 

नागपंचमी हा निसर्ग पूजेचा धार्मिक सन म्हणून भारतात सर्वत्र साजरा होतो.पर्यावरण व निसर्ग संरक्षण  व संवर्धनाच्या दृष्टिने वन्यजीव आणि साप हे भारतिय संस्कृतीचे पवित्र प्रतिक आहेत.सर्पपुजक व सर्पसेवक धार्मिक व्यक्ती त्यांच्या ईश्वरीय भावनेमुळे यांना देवता समजून, जीवदान देतात,  त्यांची हत्या व हिंसा टाळतात.दया दाखवून त्यांचे संरक्षण करतात.धार्मिक विचार प्रभावाने असो अथवा शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोनातून असो सापांचे संरक्षण होणे गरजेचे आहे.शैव उपासक नाग व सापांचा शिवशंकराचे अलंकार समजून त्यांची देवता म्हणून उपासना करतात .गिरी, पुरी, भारती, गोसावी, जंगम, लिंगायत वीरशैव इ.समाज नागाला पुज्य समजून त्याची पूजा अर्चा करतात तसेच हिंदु,जैन,शिख,माहेश्वरी,ब्राम्हण समाजाचे लोक ही सर्पहत्या करित नाहीत. खास करून नागपंचमी सणाच्या औचित्यावर महाराष्ट्रात गावोगाव भजनीबारी साठी बारी भजन , थाळी भजन आयोजित करून जागरण करतात.

        नाग सापाच्या आदरभावने पोटी नागपंचमी भक्तिभावाने साजरी केली जाते.सर्प आराधनेची वार्षिक पुजा घरी आयोजित केल्याने आता सर्पदंश होणार नाही आणि झालाच तरी मृत्यूची बाधा होणार नाही. अशी भाबडी कल्पना बहुतेकांची असते.परंतु प्रत्यक्षात साप चावल्यावर वैद्यकिय उपचार घेणेच अनिवार्य आहे. मानसिक संतुलन व धीर चांगला बळकट असल्याने रक्ताभिसरणाचा वेग नियंत्रित राहातो त्यामुळे बिनविषारी साप चावला असता मानसिक धक्याने दगावणाऱ्याचे प्रमाण धार्मिक आधाराने निश्चितच कमी करता येते.मात्र सर्पदंश हा शारिरीक अपघात असतो.निरोटॉक्झीक हिमोटॉक्झीक व मायोटॉक्झीक या टॉक्सिक आणि इंझाइमचा दुष्परिणाम शरीराच्या मज्जासंस्था स्वशनसंस्था पचण व उत्सर्जन संस्थेवर होतो परिणामी रक्ताभिसरणाचे कार्य ही बाधित होते आणि अनेक प्रकारची शारिरीक व्याधींनी गुंतागुंत वाढत गेल्याने सर्पदंशाने मृत्यू ओढवतो.हे सर्व टाळण्यासाठी वैद्यकिय उपचारच प्रभावि ठरतात घरगुती व धार्मिक उपचाराने वेळेचा अपव्यय होतो आणि अति विलंबामुळे होणारे सर्पदंशाचे उपचार ही मग रूग्णाला वाचवू शकत नाहीत. म्हणूनच प्रतिबंधात्मक उपाय योग्य प्रथमोपचार आणि त्वरित वैद्यकिय उपचार हे सर्व तातडीने जुळवून आणता आले तर रुग्णाला हमखास वाचविता येते.यासाठी मोठ्याप्रमाणात सर्प जनजागृती होणे गरजेचे आहे.आपल्या खंडप्राय भारत देशात विषारी बिनविषारी सापाबाबत खुप गैरसमज व अंधश्रद्धा आहेत .प्रचंड भीती व अज्ञानामुळे जागतिक तुलनेत  सर्पदंश मृत्यूचे प्रमाण आपल्याच देशात सर्वाधिक आहे.                                                      या सर्व पाश्र्वभूमीवर मागील पस्तीस वर्षापासून सातत्याने नि:स्वार्थ पणे सेवाभावनेने ऐक्कावन्न हजार सापांना लोक वस्तीतून पकडून जंगलात सोडून देत सापांचा व लोकांचा जिव वाचवण्याचे महत कार्य करित सर्पतज्ञ सर्परक्षक सर्पमित्र  वनिता बोराडे यांनी विश्व विक्रम प्रस्थापित केला आहे

 याची नोंद अंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आल्याने या वर्षीच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांना नामांकन प्राप्त झाले आहे.देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान  यांनी त्याचे अभिनंदन केले असून महामहिम राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी यांनी राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्कार देऊन जागतिक महिलादिनी राजभवन मुंबई येथे सत्कार केला आहे. सर्व सामान्य ग्रामीण भागातील गृहिणी ते जगातील पहिली महिला सर्परक्षक सर्पतज्ञ  ते नोबेल पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त होणे हा सर्पमित्र वनिता बोराडे यांचा सर्पसेवा कार्याचा प्रवास आश्चर्यचकित करणारा आहे.यापूर्वीच डाक सेवा विभागाने त्यांच्या नावाचे टपाल टिकीट जारी केले असून महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना छत्रपती शिवाजीमहाराज वनश्री पुरस्कार दिला आहे.या सोबतच अंतरराष्ट्रीय स्तरावर यु एन 75 हेल्थ प्लॅनेटवर ही त्यांची नियुक्ती झाली आहे .नासा तर्फे ही  त्यांना मार्क्स मिशन 2026 करिता बोर्डीग पास इसिव झाला असून त्यांचा सचित्र कार्य वृतांत मंगळयानावर छापण्यात आला आहे.विश्वसंविधान परिषद अमेरिकेने त्यांना आजीव सदस्यत्व दिले असुन पिपल फॉर ॲनिमल संस्था नवी दिल्लीच्या त्या कायम सभासद आहेत.

वनिता बोराडे ह्या आज रोजी भारत देशासह संपुर्ण आशिया खंडाचे पर्यावरण रक्षक प्रतिनिधि म्हणून  अंतरराष्ट्रीय स्तरावर  नोबेल कमेटी समोर त्या ठाम भुमीका बजावत आहेत.भारतीय सभ्यता व संस्कृती सोबतच मानवता सर्वासाठी या ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या सोयरे वनचरे फाउंडेशन तर्फे पर्यावरण हेच प्राणसंजीवन हा विश्वकल्याणकरी संदेश त्या आपल्या कृतीतून जगाला देत आहेत .यासाठी त्या राष्ट्रीय,अंतर्राष्ट्रीय पातळीवर सर्पसंरक्षण,संवर्धन व संशोधन करिता असून  विविध उपक्रम राबवित आहेत त्यांच्या सर्पप्रबोधन कार्यामुळे महाराष्ट्रातील व देशातील सर्पमित्रांच्या चळवळीना प्रोत्साहन मिळाले असून त्या ऊर्जावान झाल्या आहेत.त्यांच्या सर्पशिक्षण ,प्रशिक्षण कार्यशाळामुळे नवी दिशा मिळाली असुन शास्त्रीय भुमिका तयार झाली आहे.महिला सर्परक्षक असणाऱ्या सर्पमित्र वनिता बोराडे यांनी आपल्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्हाचा नाव लौकिक साता समुद्रा पार नेला आहे .सावित्री जिजाऊचा वारसा चालविणाऱ्या  शुरतेजश्विनी धाडसी सर्पकन्येस नागपंचमी निमीत्त हार्दिक शुभेच्छा.

   पर्यावरण हेच प्राणसंजीवन

                        चला करूया संरक्षण संवर्धन''

Comments

Popular posts from this blog

Lady Snake Rescuer who Rescued 75000 snake whitout any fees..Let's meet Vanita....know about her life ‼️

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय || निसर्गसंवर्धनाच्या दिशेने एक सशक्त जनजागृती चळवळ

सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या नवसंशोधनाने सर्पदंशमृत्यूचा धोका संपणार….!!