वन्यप्राणी संरक्षणार्थ समर्पित संस्था....... सोयरे वनचरे फाउंडेशन
बालपणापासूनच अनेक चित्र-विचित्र चित्रपटांमध्ये आपण सापांना बघत आलोय,तसेच अनेक भाकडकथा, पुराण कथा, कादंबऱ्या एवढेच काय तर धर्मग्रंथातही आपण सापांविषयी बरेच काही ऐकत आलोय. वैदिक काळापासूनच सापांना धर्मशास्त्रात श्रेष्ठ स्थान प्राप्त असायचे, कारण साप हा शिवजींचा अलंकार होय, पण एवढेच काय तर श्री विष्णू यांचे तर ते प्रिय आसन आहे. जेव्हा साक्षात भगवंताने सापांना एवढे जवळचे स्थान दिले, त्याअर्थी मानवाने सर्पपूजा करणे हे सहाजिकच होते. परंतु आजची सद्यस्थिती बघता हेच दिसून येते की मानवाच्या मनात सापाविषयी शत्रूत्व वृत्तींन चांगले घर केले आहे आणि यामूळेच आज जर कुठही साप आढळला तर, तो जणू काय फक्त आपल्याला चाण्यासाठीच आलाय या समजुतीने माणसं त्याला मारायला धावतात. मग अशा प्रसंगी साप सुद्धा आपल्या विषाचा उपयोग स्वसंरक्षणार्थ करतो आणि याच कारणास्तव आज जास्तीत जास्त सर्पदंश हे सर्पहत्येच्या केलेल्या प्रयत्नांमुळे होतात. ही संकट टळावी म्हणूनच मागील तीस वर्षापासून सर्पमित्र वनिता बोराडे सतत कार्यान्वित आहेत. आज कुठेही साप निघाला तर तिथल्या लोकांना सर्पमित्र वनिता बोराडे यांचा आधार असतो. त्यांच्या या कौशल्यामुळेच आज त्यांनी 51000 पेक्षा जास्त सापांना जीवदान दिले आहे सोबतच सर्पदंश टाळून लोकांचाही जीव वाचवला आहे.
त्यांनी केलेल्या सापाविषयीच्या जनजागृतीमुळेच आज "साप हा माणसाचा शत्रू नसून मित्र आहे" ही धारणा लोकांच्या मनात रूढ झाली सोबतच सर्पदंश आणि सर्पहत्येचे प्रमाण नगण्य होत गेले आहे. फक्त सापच नव्हे तर इतर प्राणीमात्रांविषयी लोकांच्या मनात अशीच भावना जागृत व्हावे हे त्यांचे ब्रिद आता त्यांच्या सोयरे वनचरे फाउंडेशन या संस्थेशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाचे स्वप्न बनत आहे. सोयरे वनचरे फाउंडेशनच्या सहाय्याने वनिताने युवकांची फळी निर्माण केली आहे आणि या द्वारे आज विविध उपक्रम त्या गावोगावी राबवत आहेत.
सोयरे वनचरे मल्टीपर्पज फाउंडेशन, बोथा.
वने, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण संरक्षण,संशोधन करणारी ही फाउंडेशन असून पूर्ण वेळ यासाठी समर्पित भावनेने जगाला पर्यावरण हेच प्राणसंजीवन हे ब्रिज घेऊन सतत सक्रियपणे सकारात्मक, सूचनात्मक दृष्टिकोनातून सर्वांना सोबत घेऊन विश्वकल्याण व मानव कल्याणासाठी सोयरे वनचरे फाऊंडेशन ही बहुउद्देशीय संस्था कार्यरत आहे.
संस्थेचे प्रमुख कार्य :-
• वने,वन्यजीव, निसर्ग व पर्यावरणाचे नैसर्गिक संतुलन रहावे यासाठी जैवविविधतेचे व नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण करून जतन करणे.
• लोकसहभागातून वन्यजीव व पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी जनजागरणाचे उपक्रम राबवून प्रभावी मूलभूत विकासाचे काम करणे.
• प्राण्यांची व लोकांचे हेच सुरक्षित करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीत मदत आणि पूर्ण पुनर्वसन करणे.
• अवर्षण, दुष्काळ, महामारी, महापूर, वादळे आणि वनवा अशा नैसर्गिक संकट समयी सर्वतोपरी मदत भावनेने सेवाकार्य करणे.
•शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम कार्यशाळांचे आयोजन करून राबवणे
• आदर्श वन्यजीव रक्षक व पर्यावरण सेवकांची संघटन तयार करून घेणे त्यांच्यामार्फत समाजात वन्यजीवांचे महत्त्व पटवून देत अज्ञान व अंधश्रद्ध दूर करणे.
• वृक्ष संवर्धन उपक्रम राबवणे,
सरकारी विभाग संलग्न राहून उपक्रम राबवणे.
• उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था व विभाग यांना त्यांच्या कार्यात बक्षीसं, प्रमाणपत्र, मानपत्र व सन्मान देऊन, सत्कार करून संस्थेमार्फत त्यांचा गौरव करणे.
• साप, वन्यजीव व पर्यावरण क्षेत्रात अभ्यासपूर्ण संशोधन करून नवनवीन उपक्रम राबविणे.
• कृती आराखडा आराखडा तयार करून प्रबोधनात्मक अभ्यासक्रम तयार करणे. शालेय स्तरावरून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे.
• त्यासाठी ग्रंथ व शैक्षणिक साहित्य निर्माण करणे.
• वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करण्यासाठी शास्त्रीय आराखडा तयार करून कृती पूर्ण विकास उपक्रम यशस्वी करणे.
🔴 सोयरे वनचरे फाउंडेशन ही एक वन्यजीव संरक्षण क्षेत्रात अग्रेसर असणारी नोंदणीकृत धर्मादाय संस्था आहे. प्राणीरक्षकांना पायाभूत सुविधा व अधिष्ठान मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. वन्यप्राणी व मानव यांना जीवनदान देण्याचे महत्त्वाचे कार्य सर्परक्षक व प्राणीमित्र करीत आहेत. त्यांना अधिकृत पाठबळ देण्याचे काम संस्था करीत आहे. या अनुषंगाने संस्था आपला कार्य विस्तार करीत असून सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात आता विविध आघाडींवर संघटितपणे काम करण्यासाठी सर्प मित्रांचे एकत्रित संघटन महाराष्ट्र सेना सर्प मित्र आघाडी या राजकीय पक्षाशी संलग्न होऊन आपले राजकीय ध्येय-धोरणे राबवित आहे.
Comments
Post a Comment