सर्पमित्र वनिता बोराडे यांची प्रधान वन्यजीव संरक्षक यांच्याशी वन्यजीव संरक्षणार्थ बैठक व चर्चा
संपूर्ण महाराष्ट्रासाठी या बैठकीत कृती आराखड्यामधून तरतूद करीत प्रस्तावास मंजुरी देण्यासंदर्भाने मुख्य वन्यजीव संरक्षक मा .श्री. सुनील लिमये यांनी होकारार्थी आश्वासन दिले सुरक्षितपणे वन्यजीवांना संकटातून वाचवतांना तज्ञ व प्रशिक्षित वन्यजीव व साप रक्षक यांनी कसे काम करावे, प्राण्यांना जंगलात कसे सोडावे व लोकांना कशा प्रकारे शास्त्रीय व कायदेशीर ज्ञान देऊन जनजागृती करावी, यासाठी शासनाची कशी भूमिका असावी या महत्त्वपूर्ण विषयावर सर्पमित्र वनिता बोराडे यांनी आपली बाजू मांडून वरील बाबी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या.
गाव पातळीवर काम करत असतांना येणाऱ्या अडचणी सोडून लोक सहभाग कसा मिळवावा याचा प्रदीर्घ अनुभव असल्याने वनिता बोराडे यांनी या क्षेत्रात विश्वविक्रम प्रस्थापित करून जगात प्रथम सर्परक्षक महिला होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ सर्वांना व्हावा आणि प्रभावी अंमलबजावणी करता यावी यासाठी शासकीय तरतुदी नुसार योग्य ते सहकार्य करण्यात येईल असे या भेटीत ठरविण्यात आले.
Comments
Post a Comment