जगातील सर्वोच्च नोबेल पुरस्कारासाठी सर्पमित्र वनिता बोराडे यांना सलग तिसर्‍यांदा नामांकन प्राप्त..!!

 जगातील सर्वोच्च नोबेल पुरस्कारासाठी सर्पमित्र वनिता बोराडे यांना सलग तिसर्‍यांदा नामांकन प्राप्त..!!

मागील दोन वर्षापासून सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या वने, वन्यजीव, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात आपल्या सेवा कार्याची छाप सोडणार्‍या सर्पमित्र वनिता बोराडे यांना नॉर्वेजियन नोबेल कमिटी ने नोबेल पुरस्कारासाठी नामांकन दिले होते. याहीवर्षी 2021-22 करिता शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी सलग तिसर्‍यांदा  त्यांना नामांकन प्राप्त झाले आहे. याची अधिकृत सुचना  दिनांक 15/12/2021 रोजी ईमेल द्वारे वनिताताईंना नोबेल पुरस्कार कमिटी कडून देण्यात आली आहे. 

सलग तिसर्‍यांदा नोबेल पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त करणाऱ्या सर्पमित्र वनिता बोराडे ह्या एकमेव भारतीय महिला ठरल्या आहेत. त्यांनी  51000 पेक्षा जास्त सापांना वाचवून जंगलात सोडल्याचा विश्‍वविक्रम प्रस्थापित केला असून यामूळे लाखो सापांना व लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे जीवनदान मिळाले आहे. 

मुलूखावेगळ्या कामगिरीचा जगावर ठसा उमटविण्यात वनिता बोराडे यशस्वी  झाल्याने जगातली पहिली महिला सर्परक्षक तथा दि स्नेक लेडी ऑफ द वर्ल्ड  हा जागतीक प्रतिष्ठेचा बहुमान त्यांना प्राप्त झाला असुन त्यांची जगभर ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या या निस्वार्थ सेवाभावी कार्याला सलग तिसऱ्यांदा नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देवून नोबेल कमिटीने त्यांच्या कार्याची पावती दिली आहे. यामुळे आपल्या देशाच्या नाव लौकिकात भर पडली असून बुलढाणा जिल्ह्याची व महाराष्ट्राची मान उंचावली आहे देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.  पर्यावरण व वन्यजीव संरक्षण क्षेत्रात संरक्षण, संवर्धन व संशोधन करून पूर्णवेळ निसर्ग सेवेला देऊन समर्पित भावनेने काम करणाऱ्या वनिता बोराडे यांनी पर्यावरणवादी सर्पसंरक्षक म्हणून आंतराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळवली आहे. स्थानिक पातळीवर पूर्वी जर कुठ साप आढळला तर लोक भीतीपोटी देवाचा धावा करायचे किंवा साप मारणाऱ्याला बोलवा असे म्हणायचे, जर कोणाला सर्पदंश झाला तर “आता प्राण वाचवने देवाच्या हाती आहे” असं म्हणायचे पण आता कुठेही साप आढळला तर लोक म्हणतात “वनिताताईंना बोलवा, फोन  लावा, घाबरायचे काहीही कारण नाही. जरी साप चावला तरी ताई रूगणाला मरू देत नाहीत, त्याचा वैद्यकिय उपचाराने हमखास प्राण वाचवतात.” 

आपल्या सखोल वैज्ञानिक ज्ञानाच्या व प्रदिर्घ अनुभवाच्या बळावर, वनिताताई संकटकाळी लोकांच्या मदतीला धावून जातात, सापांची व लोकांची मुक्तता करून त्यांना जीवदान देतात. ताईंच्या ह्या कृतीने सर्वाना  मोठा दिलासा मिळत आहे. सापांचा व लोकांचा जीव वाचवण्याचे ईश्वरीय कार्य करणाऱ्या वनिता बोराडे आज जगात वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. त्यांच्या सेवा कार्याने गगनाला गवसणी घातली आहे यात शंकाच नाही.  

आपल्या राज्य अणि देशा पुरते बोलायचे झाल्यास प्रशिक्षित अणि युवा सर्पमित्रांची निस्वार्थ काम करणारी सेवाभावी संघटना त्यांनी निर्माण केली असुन वन्यजीव संरक्षण साठी जिवित्वाचा धोका पत्करून हे सर्पमित्र तत्परतेने लोकांना सेवा देतात यामूळे विविध ठिकाणी कार्यान्वित असलेल्या सर्पमित्रांच्या चळवळी उर्जावान झाल्या आहेत वनिताताईंचा आदर्श घेत आपल्या देशात व देशाबाहेर ही असंख्य युती व महीला सर्पमित्र म्हणून काम करण्यास पुढाकार घेत आहेत. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी 2022 करिता नोबेल कमिटीकडे मानवता सर्वांसाठी!!  हा पर्यावरण संरक्षक संदेश देत "पर्यावरण हेच प्राणसंजीवन" असल्याचे वनिताताई  जगाला पटवून देत आहेत.सद्यस्थितीत जग वैश्विक महामारीच्या खाईत आहे, प्राणवायूचा प्रचंड तुटवडा कोरोना काळात जगाने अनुभवला आहे. ग्लोबल वार्मिंग, प्रदुषण, महापुर, प्रलयकारी भूकंप व विषाणूजन्य साथीचे आजार या जागतिक समस्यांमुळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. ब्रम्हांडाचे व पृथ्वीचे अस्तीत्व हे निकोप पर्यावरणावर अवलंबून असल्याने विश्वो रक्षति रक्षीताः या न्यायाप्रमाणे "आता विश्वात्मके देवे" हे ज्ञानेशांचे  पसायदान साकार करण्यासाठी विश्वबंधुत्वाने विश्वशांती निर्माण केली तरच "वसुधैव कुटूंबकम्" ची परीवार भावना सगळ्या जगात साकार होईल, अशी प्रतीक्रिया त्यांनी आमच्या प्रतिनिधीं कडे व्यक्त केली. या पुरस्काराने पुन्हा एकदा आपल्या देशाचा निश्चितच सन्मान होईल, म्हणूनच सर्पमित्र वनिताताई बोराडे यांना 2022 च्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सलग तिसर्‍यांदा नामांकन प्राप्त केल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन...!!!

Comments

Popular posts from this blog

Lady Snake Rescuer who Rescued 75000 snake whitout any fees..Let's meet Vanita....know about her life ‼️

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय || निसर्गसंवर्धनाच्या दिशेने एक सशक्त जनजागृती चळवळ

सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या नवसंशोधनाने सर्पदंशमृत्यूचा धोका संपणार….!!