वन्य-जीव व साप शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा
वन्य-जीव व साप शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा
प्रशिक्षक
सर्पमित्र वनिता बोराडे,
डी.भास्कर.
सौजन्य
उपवनसंरक्षक कार्यालय बुलडाणा,
वनविभाग बुलडाणा.
वन अधिकारी व कर्मचारी, वनपाल आणि वन रक्षक या सर्वांचे शिक्षण-प्रशिक्षण करून त्यांना वन्य-जीव कायद्या विषयी प्रबोधीत करण्यासाठी प्रधान वन्यजीव संरक्षक, नागपुर यांच्या आदेशाप्रमाणे उपवनसंरक्षक बुलडाणा यांनी बुलडाणा, वनविभाग बुलडाणा आणि उपविभाग मेहकर मधील सर्व कर्मचारी वृंदांचे एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करून शिक्षण प्रशिक्षण केले. यामधे वन्यजीव व साप यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी यांना सविस्तर मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक देण्यात आले. यामधे मा.श्री. अक्षय गजभिये,उपवनसंरक्षक, वनविभाग बुलडाणा यांच्या आदेशानुसार सहाय्यक वनसंरक्षक मेहकर मा.श्री.संदीप गव्हारे साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी मा.श्री.प्रकाश सावळे. वनपरिक्षेत्र अधिकारी घाटबोरी मा.श्री. तोंडीलायता साहेब यांनी आपल्या संपूर्ण वनपाल व वन-रक्षकांसह 11 ते 5 या वेळेत वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय मेहकर येथे उपस्थित होऊन सहभाग घेतला. शासकीय वन नियम व कोरोना नियमांचे पालन करीत अतिशय कडक शिस्तीत प्रशिक्षणार्थ्यांना या कार्यशाळेत प्रशिक्षित करण्यात आले. ध्वनीचित्रफीत व छायाचित्र मार्गदर्शन सर्पमित्र डी.भास्कर यांनी केले तर प्रात्याक्षिके कुशल सर्पतज्ञ आणि सर्पमित्र वनिता बोराडे यांनी दिली. तसेच प्रशिक्षणादरम्यान निमंत्रित, प्राणीमित्र व सर्पमित्र,पक्षी अभ्यासक, मी लोणारकर निसर्ग मित्रमंडळाचे सक्रीय सदस्य मा.श्री.विनय कुलकर्णी यांनी मागील 20 वर्षातील आपल्या वन्यजीव सेवेतील अनुभव कथन केले, उपस्थितांना सर्प प्रतिबंधात्मक उपाय व सर्पदंश प्रथमोपचार सांगितले. मा.श्री.म्हस्के सर, कला शिक्षक सुल्तानपुर यांनी वृक्षलागवड व संवर्धनाचे महत्व विशद केले.
सचिन कापुरे यांनीही महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. आदरणीय सहाय्यक वनसंरक्षक संदीप गव्हारे साहेबांनी व वनपरिक्षेत्र अधिकारी,मेहकर मा.श्री.प्रकाश सावळे साहेबांनी कार्यशाळेच्या समारोपात प्रशिक्षणार्थ्यांना मनोगत जाणून घेत समाधान व्यक्त केले. कार्यशाळेची सांगता प्रशिक्षणार्थी वनरक्षक श्री.
धंदर यांच्या सुमधूर आवाजातील जनजागृतीपर भक्ती-गीताने करण्यात आली.या एकदिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शिकाऊ सर्पमित्र विजय नरवाडे,मानव, कु.लक्ष्मी,आदित्य व पार्थ डी.भास्कर, बालिका श्रावणी प्काश सावळे यांनी उत्स्फूर्त योगदान दिले.
Comments
Post a Comment