दै.लोकमत वाचकप्रियतेचा सुवर्ण महोत्सव कृतज्ञता पर्व म्हणुन साजरा करीत आहे . संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर ही लोकमत आज क्र.1 चे दैनिक म्हणुन आपला नावलौकिक उत्तरोत्तर वृद्धिंगत करीत आहे. दै.लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेयरमैन तथा माजी खासदार विजय दर्डा यांचे शुभ हस्ते 'नारी शक्ती-राष्ट्रपती पुरस्कार' प्राप्त जगातील पहिल्या महिला सर्परक्षक सर्पमित्र वनिता बोराडे यांनी सापांचा व लोकांचा जिव वाचवून 51000 सापांना जीवनदान देण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे तसेच शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांना नामांकन प्राप्त झाले आहे. या कामगिरीने आपल्या देशाच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. राजमाता जिजाऊ च्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याची ही शुरतेजस्वीनी विद्युल्लता आज आपल्या कर्तृत्वाच्या लख्ख प्रकाशाने जग दिपवत आहे. यामुळेच आज त्यांचा लोकमत तर्फे कृतज्ञता पुर्वक बुलडाणा येथील कार्यक्रमात सत्कार करण्यात आला . याप्रसंगी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसोबत मोठ्याप्रमाणात पत्रकार बांधव आणि लोकमतचे वार्ताहर व विक्रेतेही उपस्थित होते.






Comments

Popular posts from this blog

Lady Snake Rescuer who Rescued 75000 snake whitout any fees..Let's meet Vanita....know about her life ‼️

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय || निसर्गसंवर्धनाच्या दिशेने एक सशक्त जनजागृती चळवळ

सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या नवसंशोधनाने सर्पदंशमृत्यूचा धोका संपणार….!!