"वन आणि वनिता बोराडे" हे वातावरणाशी व वन्यप्राण्यांशी समरस असणारे समीकरण !!

भारत भूमी हि वन वैभवाने नटली असून नद्या, पर्वत, लेण्या, गड, किल्ले, नयनरम्य ऐतेहासिक पर्यटन स्थळे व धार्मिक स्थळे आणि वास्तुकलेचा जागतिक वारसा असणारी मंदिरे भारतीय संस्कृती ही वनसंस्कृती आहे. राम आणि कृष्ण हे अवतारी महापुरुष सुद्धा मानवी जीवनाचे धडे गिरवण्यासाठी व्यास, वाल्मिकी आणि सांदीपाणी  ऋषींच्या आश्रमात वनात    वास्तव्यास गेले कारण ऋषी-मुनी व संतांनी सूक्षम चिंतनातून वन्यप्राणी व मानवप्राणी याच्या सुसंबद्ध सहचाराची व परस्पर समृद्धीसाठी आवश्यक असलेली समन्वय व सृजनशील जीवनप्रणाली विकसित केली जे आधुनिक जगातातील प्रत्येक मानवासाठी कल्याणकारी आहे. हि जीवनप्रणाली म्हणजेच मानवाची सभ्यता आणि संस्कृती आहे. मानवाच्या अती हव्यासामुळे वन्यप्राणी आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून फक्त मानव केंद्रित समृद्ध जीवन हे निसर्गनियमांचे उल्लंघन करणारे असल्याने वन्यप्राणी व मानव यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. प्राचीनकाळी असे नव्हते, तर प्रत्येक भारतीय पूज्य देवी देवतांसोबत कोणता ना कोणता प्राणी असायचा आणि त्या प्राण्याला तेवढेच महत्त्व होते जेवढे त्या देवतांना महत्त्व असायचे जसे कि, दुर्गादेवी सोबत असलेला सिंह-वाघ, शंकरांच्या गळ्यात असणारा नाग, विष्णूचे वाहन गरुड पक्षी तर गणपतीचा उंदीर अशी उदाहरणे देता येतील, म्हणूनच गायीला गो-माता तर भूमीला भू-माता मानणारी भारतीय संस्कृती हि आजही वनाशी व वन्यप्राण्यांशी अतूट नाते दर्शविते “जननी जन्म भूमिश्च | स्वर्गादपि गरीयसी” “वसुधैव कुटुंबकम्” इतकेच काय “इदं सर्वं खल्विदं ब्रम्ह” थोडक्यात “सत्यं शिवं सुंदरम” "हे विश्वची माझे घर"  हि कल्याणकारी ज्ञानेशाची वाणी पासायदानातून "परस्परे जडो मैत्र जीवांचे" हा संदेश देते. याला अनुसरून संत तुकाराम महाराज तर "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" म्हणत भंडाऱ्या डोंगरांवर कायमचे वास्तव्यास गेले. महाराष्ट्र हि संत भूमी  आहे. संतांचा वारसा जपणारी जगातील पहिली महिला सर्पमित्र वनिता बोराडे हिची वाटचाल आज संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहे. तर जाणून घेऊया या सर्पसखी च्या सर्पमैत्री बद्दल !!  

 वन आणि वनिता बोराडे हे असेच समरसता असणारे समीकरण आहे. वनिताने वनसंस्कृतीची जोपासना करीत सोयरे वनचरे प्रतीष्ठानाची स्थापना केली. वने, वन्यजीव,निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात संरक्षण संवर्धन व संशोधनाचे कार्य भारतात सुरु करून सर्व जगभर पसरविले आहे. सापांचा आणि लोकांचा जीव वाचावून विश्वविक्रमी कामगिरी केली. वनांचे आणि वन्यप्रण्याचे मानावासोबतचे सहजीवन सोयरे वनचरे प्रतिष्ठाने सुयोग्य पद्धतीने स्थापित केले. यामुळे साप मानवाचा जीवघेणा शत्रू नसून जीवदायी मित्र आहे, हि भूमिका पटवून देण्यासाठी जनजागरण केले. संपूर्ण देशात सर्पमित्र,प्राणीमित्र व पक्षीमित्रांची निस्वार्थपणे सेवाभावी काम करणारी चमू उभी केली राष्ट्रीय अंतराष्ट्रीय पातळीवर आपला विचार मांडण्यासाठी जागतिक स्तरावरील पर्यावरणावर काम करणाऱ्या सर्व संस्थांचे सदस्यत्व प्राप्त करीत आपले विचार त्यांना पटवून दिले व आज पर्यावरणीय वन्यजीव संरक्षण कार्याला संपूर्ण जगातून पाठींबा मिळाला . भारतातील शिकारी द्वारे होणारी हिंसा आणि हत्या पूर्णपणे थांबविली प्राण्यांच्या संरक्षण, संवर्धन करून पशु अनाथालयाची सुरुवात केली. अनेक वन्यजीव अभयारण्यांमध्ये लोक वस्तीतून संकटग्रस्त प्राणी नेऊन सोडले. वनाला समृद्ध करणारे घटक जल, जमीन आणि जीव यांची साखळी सुरळीत राहावी म्हणून नद्यांचे रुंदीकरण जल स्त्रोतांचे संरक्षण करून वन जमिनी आरक्षित केल्या. वन्यजीवांच्या नष्टप्राय होत जाणाऱ्या प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी त्यांचे पुन:प्रजनन व्हावे म्हणून वातावरण निर्मिती केली. यामध्ये कृत्रिमरित्या सापांची अंडी उबवून त्यातून पिले जन्माला घालण्याचे नव-तंत्र विकसित केले. जगातील पहिली महिला सर्प रक्षक म्हणून नेतृत्व करतांना साप आणि सरीसृप वर्गातील प्रजातींचे संरक्षण संवर्धन व संशोधनाचे कार्य अविरत पणे सुरु ठेवले, आज रोजी ५१००० पेक्षा जास्त साप वाचवून विश्वविक्रम प्रस्थापित केला व जगातील पहिली महिला सर्पमित्र तथा सर्परक्षक होण्याचा बहुमान प्राप्त केला. सरीसृप शास्त्रज्ञ तथा सर्पतज्ञ हि जबाबदारी पेलवतांना  अनेक पातळीवर आव्हानात्मक संशोधन कार्य सुरु केले. सर्पदंश प्रतिबंधात्मक उपाय शोधतांना थेट  गर्भार माता व नवजात शिशुसाठी सर्प प्रतीलसे ची पूर्व प्रती लस  संशोधन करण्याचा विडा उचलला. जगभरातील सर्प शास्त्रज्ञनांची वैद्यकीय चमू  यासाठी वनिता बोराडे यांच्या मार्गदर्शनात अविरत कार्यरत आहे.  प्राथमिक पातळीवर या संशोधनाचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. लवकरच याचे पेटेंट हि  प्राप्त होईल. जगभरातून सर्पदंशाचा धोका कायमचा नष्ट होण्यासाठी हि ऐतेहासिक कामगिरी ठरेल यात शंका नाही. लोकांमध्ये जनजागरणकरून लोकसहभागातून वन्यप्राणी व पर्यावरण प्रदूषण मुक्त करण्याची चळवळ सुधृढ व समृद्ध करण्यासाठी.पर्यावरणाच्या संतुलनासाठी भारतात समर्पित पणे कार्य करून सर्व  जगापुढे नवा आदर्श निर्माण केला. सोयरे वनचरे प्रतिष्ठानाचे  ब्रीद असणारे महावाक्य “मानवता सर्वांसाठी !! व पर्यावरण हेच प्राणसंजीवन” याला सार्थ करण्यासाठी आपल्या कृतीशील वर्तनातून वनिताने जगाला दाखवून दिले आहे.


Comments

Popular posts from this blog

Lady Snake Rescuer who Rescued 75000 snake whitout any fees..Let's meet Vanita....know about her life ‼️

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय || निसर्गसंवर्धनाच्या दिशेने एक सशक्त जनजागृती चळवळ

सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या नवसंशोधनाने सर्पदंशमृत्यूचा धोका संपणार….!!