सर्पमित्र वनिता बोराडे महाराष्ट्र जनगौरव पुरस्काराने महामहीम राज्यपाल श्री.रमेश बैस यांच्या हस्ते सन्मानित
|
मेहकर येथील सर्पमित्र वनिता बोरडे यांचा सन्मान करताना राज्यपाल रमेश बैस. सोबत उपस्थित सुबोध सावजी,डॉ. राहुल सावजी |
दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी राजभवन मुंबई येथे महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या शुभहस्ते समाजामध्ये विविध क्षेत्रात आदर्श कामगिरी करणाऱ्या निवडक समाजसेवकांना महाराष्ट्र जनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी केले असून संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर राहुल सुबोध सावजी यांनी आपल्या मातोश्री सपना सावजी यांच्या स्मरणार्थ वडील माजी राज्यमंत्री सुबोध भाऊ सावजी यांचा समाजसेवेचा वारसा सातत्याने सुरू ठेवण्यासाठी आपण या कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्याचे सांगितले. माजी राज्यमंत्री सुबोध भाऊ सावजी यांनी सामाजिक ऋण फेडण्याच्या भावनेतून गोरगरिबांची सेवा करून त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी राजकारणा सोबतच आपण सामाजिक सेवेचा वारसा जोपासत असल्याचे आवर्जून सांगितले शैलेश सुबोध सावजी व संपूर्ण सावजी परिवाराने या सत्कार समारंभात आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत व अभिनंदन केले कार्यक्रमाच्या मुख्य प्रबोधन पर भाषणात माननीय राज्यपाल यांनी सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित सेवाभावी सामाजिक उपक्रमांचे खूप कौतुक केले व त्यांच्या या समाज उपयोगी कार्याबद्दल माजी राज्यमंत्री सुबोध भाऊ सावजी व चिरंजीव डॉक्टर राहुल सुबोध सावजी यांचे अभिनंदन केले.या दिमाखदार सोहळ्यात जगातील पहिल्या महिला सर्पमित्र तथा सर्व रक्षक नारीशक्ती पुरस्कार प्राप्त सर्पमित्र वनिता बोराडे यांचा महामहीम राज्यपाल यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र जनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेता सचिन पिळगावकर, भजन सम्राट पद्मश्री अनुप जलोटा, आंतरराष्ट्रीय नृत्यांगना सुद्धा चंद्रन, अभिनेत्री जुही बब्बर इत्यादी सह हास्य जत्रेतील हास्य अभिनेता समीर चौगुले हे देखील उपस्थित होते.





Comments
Post a Comment