सर्पमित्र वानिता बोराडे यांची शेतकरी प्रबोधनासाठी जिल्हा स्तरीय कृषी महोत्सव मेहकर येथे सर्प शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न...




सोयरे वनचरे प्रतिष्ठान द्वारे सर्प शिक्षण-प्रशिक्षण कार्यशाळा राबवून
"साप शेतकऱ्यांचा शत्रू नसून मित्र आहे" हा संदेश जिल्हा स्तरीय कृषी महोत्सवातून उपस्थितांना समजाविण्यासाठी सर्प शिक्षण-प्रशिक्षण कार्यशाळा आयोजीत करून सर्पमित्र वनिता बोराडे यांनी सापांची उपयुक्तता प्रत्याक्षिके सादर कारून सर्वांच्या निदर्शनास आणून दिली विषारी बिनविषारी साप कसे ओळखावेत, साप चावला असता काय उपाय करावेत, आपल्या आजूबाजूला साप येऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी, हे अगदी सहजतेने शेतकऱ्यांना समजावून सांगितले. सापबाद्दलची भीती नाहीशी होऊन, प्रिती वाढावी यासाठी शेतकऱ्यांना साप हातात देऊन त्याची वैद्यानिक माहिती हि दिली.

                                   खासदार मा.ना.श्री.प्रताप्रावजी जाधव यांनी सुद्धा सापांचा स्पर्श अनुभवला तसेच मा.श्री.माधवरावजी जाधाव सभापती कृ.उ.बा.समिता मेहकर यांनी हि सापांना हाताळले व आपल्या मनातील भीती दूर केली मेहकर विधानसभा मतदार संघाचे चे लोकप्रिय आमदार मा.श्री. संजयजी रायमुलकर यांनी धामण साप हातात घेऊन "धामण साप बिनविषारी | उंदीर,घुशींचा नाश करी ||" हि म्हण शेतकऱ्यांकडून म्हणून घेतली. या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचा रोमांच सर्वांनी अनुभवला तसेच "विषारी सापांची नावे चार | घोणस, फुरसे, नाग, मण्यार ||" या विषारी सापांची ही माहिती घेतली. शेतकरी, कृषी अधिकारी,बचत गटांच्या महिला व कृषी महोत्सवास भेट देणारे इतर सर्वजण या कार्यक्रमाने सापांच्या वेगळ्या विश्वात गेल्यामुळे तल्लीनतेने रममाण झाले होते. त्यांच्या मनातील असंख्य शंकां-कुशंकांची उत्तरे सर्पमित्र वनिता बोराडे यांनी दिली. तर या कार्याकामाच्या यशस्वितेसाठी सर्पमित्र विनय कुळकर्णी व डी.भास्कर यांनी सहकार्य केले. आयोजकांच्या वतीने आमदार मा.श्री.संजय रायमुलकर यांचे शुभहस्ते सर्पमित्र वनिता बोराडे व त्यांच्या टीम चा यथोचित सत्कार करून त्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान केले.








Comments

Popular posts from this blog

Lady Snake Rescuer who Rescued 75000 snake whitout any fees..Let's meet Vanita....know about her life ‼️

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय || निसर्गसंवर्धनाच्या दिशेने एक सशक्त जनजागृती चळवळ

सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या नवसंशोधनाने सर्पदंशमृत्यूचा धोका संपणार….!!