नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर सर्पमित्र वनिता बोराडे यांची सर्प माहितीचे वैज्ञानिक कार्यशाळा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय घाटबोरी येथे संपन्न
आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिन आणि नागपंचमी चा शुभदिन असा पवित्र योग जुळून आला, याच्या औचीत्यावर सर्पमित्र वनिता बोराडे यांनी सर्प माहितीची वैज्ञानिक कार्यशाळा घाटबोरी येथे आयोजित केली असता या कार्यशाळेत वन कर्मचाऱ्यांचे शिक्षण प्रशिक्षण केले. यामध्ये सापांची अनेक रहस्य रहस्य उलगडून दाखविली. सापांची भीती आणि अंधश्रद्धा घालविण्यासाठी प्रशिक्षानार्थ्यांचे वैज्ञानिक प्रबोधन करण्यात आले
दुपारी १ वाजता पासून सुरु झालेल्या या कार्यशाळेत वन कर्मचारी, वन रक्षक आणि वनपाल यांनी व वन परिक्षेत्र अधिकारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. याप्रसंगी माजी बुलढाणा जि.प.अध्यक्ष आदिवासी नेते तथा युवक कॉंग्रेस चे युवा नेते श्री.भास्करराव ठाकरे आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या आदिवासी महिला सरचिटणीस सौ.नंदिनी तारपे, आदिवासी नेते श्री. राजु तारपे व त्यांच्या आदिवासी बांधवांनी हि या कार्यशाळेचा लाभ घेतला. या सर्प कार्यशाळेचे अआयोजन वानापारीक्षेत्र अधिकारी श्री अंकुश येवले साहेब व मेहकर वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.प्रकश सावळे साहेब यांनी जिल्हा उपवन संरक्षक श्रीमती सरोज गवस यांच्या मार्गदर्शनात केले. कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न करण्यात आला, सुरुवातीला सैद्धांतिक तथा वैज्ञानिक माहिती, वन, वन्यजीव व साप यांच्या बद्दल सविस्तर समजाविण्यात आली नंतर जंगलामध्ये साप सोडतांना घाटबोरी वनपरिक्षेत्राच्या पाथर्डी बीट मध्ये वन कर्मचार्यांना जंगलात साप सोडते वेळी विषारी बिनविषारी सापांची प्रात्याक्षिके करून दाखविली व नंतर उपस्थितांकडून ती करवून घेतली. जीवनात पहिल्यांदाच सापाला हाती घेऊन स्पर्श केल्यामुळे काहींच्या काळजाचा ठोका चुकला !! जिगरबाज वनरक्षक शिपाई सुद्धा साप हाताळण्यासाठी भीत-भीतच पुढे येत होते. परंतु जगातील पहिल्या महिला सर्परक्षक वनिता बोराडे ह्या कुशल मार्गदर्शक व सर्पतज्ञ असल्यामुळे त्यांनी सापांची प्रात्याक्षिके बिनचूक व शास्त्रीय पद्धतीने कौन घेतली, माहिती व सराव झाल्यामुळे त्यांच्या तज्ञ मार्ग्दर्शांत हळूहळू सर्वांचीच भीती कमी झाली. पुरुष वन कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने सापांची प्रात्याक्षिके करण्यासाठी त्यांना हाती घेऊन स्पर्श करण्यासाठी महिला वन रक्षक व शिपाई महिलाही पुढे आल्या व त्यांनी हि मोठ्या हिम्मतीने सहभाग नोंदविला. कार्यशाळेचा शेवट जंगलात सापांना सोडून करण्यात आल तर उपस्थितांना व सहभागी नागरिकांना सोयरे वनचरे फाउंडेशन तर्फे वैज्ञानिक सर्प माहितीची दिनदर्शिका सप्रेम भेट देण्यात आली. वैज्ञानिक पद्धतीने नागपंचमी साजरी करून वन कर्मचाऱ्यांचे शिक्षण-प्रशिक्षण देऊन कार्यशाळा संपन्न करण्यात आली .


Comments
Post a Comment