वन्यजीव सप्ताह निमित्त दिल्ली येथे राष्ट्रीय परिषदे मध्ये सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या सर्पजनजागृती कार्यशाळेचे आयोजन.

गांधी जयंतीच्या शुभ औचीत्यावर २ ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर वन्यजीव साप्ताह संपूर्ण भारत भर साजरा केल्या जातो, यावर्षी साप व वन्यजीव यांच्या जनजागृती करिता सोयरे वनचरे फौंडेशन ने जन जागृती अभियान संपूर्ण देश पातळीवर राबविले याचाच एक भाग म्हणून गांधी जयंतीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या राजघाट नवी दिल्ली येथील समाधीस्थाळी नतमस्तक होऊन पुढे फरीदाबाद येथे या अभियानाची भव्य आंतराष्ट्रीय परिषदेच्या कार्यक्रमात प्रबोधन करून सांगता करण्यात आली, जगातील पहिल्या महिला सर्प रक्षक वनिता बोराडे यांचा भव्य सत्कार वर्ल्ड किंग वर्ल्ड रेकॉर्ड युनियन यांचे भारतीय प्रतिनिधी असणाऱ्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे करण्यात आला. या वेळी आयोजित कार्वियशाळेत विविध देशांच्यया प्रतिनिधींनी सहभागी होत सर्पमित्र वनिता बोराडे यांच्याकडून सर्प शिक्षण प्रशिक्षणाचे धडे घेतले सोयरे वनचरे फौंडेशन व केंद्रीय वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे जनजागृती अभियान राबविण्यात आले. या वेळी नेपाल, तीब्बेत, नेदरलैंड, चाइना, थाईलैंड, जापान, इसराइल, इंडोनेशिया, मलेशिया या एशियन कन्ट्रीजच्या प्रतिनिधींनी सापांविषयी रोमांचक प्रत्यक्ष अनुभव व माहिती घेतली. ३ ऑक्टोंबर रोजी डॉ.विश्वरूप रोय चौधरी, सर्वेसर्वा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या शुभहस्ते सर्पमित्र वनिता बोराडे यांचा शाल, स्मृतीचींह व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. या अंतराष्ट्रीय पातळीवरील सत्कार सन्मानाचे कौतुक तथा अभिनंदन करीत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ., पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री भूपेंद्र यादव, विविध राज्यांचे वनमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मा.ना.सुधीर मुंगंटीवार यांनी सर्पमित्र वनिता बोराडे यांचे हार्दिक शुभेच्छांसह अभिनंदन केले.





 





Comments

Popular posts from this blog

Lady Snake Rescuer who Rescued 75000 snake whitout any fees..Let's meet Vanita....know about her life ‼️

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय || निसर्गसंवर्धनाच्या दिशेने एक सशक्त जनजागृती चळवळ

सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या नवसंशोधनाने सर्पदंशमृत्यूचा धोका संपणार….!!