मानव आणि वन्यजीव संघर्ष ! संपुष्टात आणण्यासाठी सर्पमित्र वनिता बोराडेंची प्रबोधन प्रशिक्षण कार्यशाळा तहसील कार्यालय मेहकर येथे संपन्न !
दिनांक १०/०३/२०२५ रोजी,
मेहकर येथे तहसील कार्यालयाच्या प्रशस्त हॉल मध्ये सर्पजनजागरण अभियानांतर्गत वनविभागाच्या सौजन्याने सोयरे वनचरे फौंडेशन द्वारा वन्यजीव कार्यशाळा आयोजित केली असता यामध्ये तहसीलदार मा.श्री.निलेश मडके साहेब व तहसील कार्यालय मेहकर आणि उपविभागीय महसूल अधिकारी मा.श्री.जोगी साहेब आणि त्यांचे कार्यालयीन कर्माचारी वृन्द यांनी सहभाग घेतला यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही सामावेश होता. सापांबद्दल व वन्यप्राण्यांबद्दल शास्त्रीय वैद्यानिक माहिती देण्यात आली, महाराष्ट्रात एकूण ५२ साप असून त्यातील ४० बिनविषारी तर १२ विषारी आहेत. बिनविषारी सापांपासून आपल्याला कोणताही धोका नाही, उलट हे साप उंदीर खाऊन शेती व शेतकऱ्यांची मोठी मदत करतात. उंदरांच्या बेसुमार पैदासीवर नियंत्रण आणतात व निसर्गाचा समतोल राखतात. त्यांचे संरक्षण, संवर्धन केले असता आपणास मोठी मदत होते. तर १२ विषारी सापांपैकी ८ साप हे पाणथळ व नदीच्या ठिकाणी किनाऱ्या लगत राहतात, घनघोर झाडी व जंगल परिसरात राहतात तर केवळ चार च साप मानवी परिसराच्या आजूबाजूला उंदीर, सरडे, पाली आणि बेडूक या आपल्या भक्षाच्या शोधात येतात. यांची ओळख करून घेतली असता आपण योग्य ती दक्षता घेऊन विषारी सापांच्या दंशापासून वाचू शकतो म्हणून या कार्यशाळेत 4ही विषारी सापांची सविस्तर माहिती दिनदर्शिकेतून सचित्रपणे करून देत, सर्पमित्र वनिता बोराडे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
विषारी सापांची ओळख आणि नावे सहज पाठ व्हावीत म्हणून "विषारी सापांची नावे चार | घोणस, फुरसे, नाग, मण्यार" हि म्हण सर्वांकडून वदवून घेतली. तसेच धामण सापाची ओळख करून देतांना "धामण साप बिनविषारी | उंदीर घुशींचा नाश करी " याही म्हणीचे पाठांतर करून घेतले. प्रशिक्षणार्थ्यांना बिनविषारी सापांची प्रात्याक्षिके करून दाखविली आणि विषारी सापांबाबतीत प्रतिबंधात्मक उपाय समजाविले विषारी साप चावला असता "काय प्रथोमोपचार करावे ?" हे आवर्जून शिकविले. दोन तास चाललेल्या या कार्यशाळेत मिळालेल्या माहितीमुळे सर्वांची भीती नाहीशी झाल्याने, साप आणि पर्यावरण यांचे संरक्षण करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे याची जाणीव सर्वांना झाली. या बाबतीत वन्यजीव कायदे व भारतीय संविधानाची काय भूमिका आहे याचे कायद्शीर मार्गदर्शन करण्यात आले. सर्प हत्या हि गंभीर गुन्हा असल्याने सापांना वाचविणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याने जनजागरण करून त्यांचे मौलिक प्रबोधन करण्यात आले. साप वाचवा, पर्यावरण वाचवा, आपले पर्यावरण ! आणि आपले वन्यजीव ! हे मानवी जीवनाचे सहचर असल्याने, पर्यावरण हेच प्रांसंजीवन असून आपले अस्तित्व त्यांच्यार अवलंबून आहे असे शिक्षण प्रशिक्षण सर्वांना देण्यात आले. सापाची माहिती व त्याचा स्पर्श हा प्रशिक्षणार्थ्यांसाठी रोमांचक अनुभव असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली प्रशिक्षणार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शास्त्रीय पद्धतीने देत त्यांचे शंका समाधान करण्यात आले, सापांची भीती अंधश्रद्धा व गैरसमजामुळे असल्याने चुकीचे समज लोकांमध्ये दृढ झाले आहेत. साप मानवाचा शत्रू नसून मित्र आहे हे सर्वांना समजावून सांगण्यात आले, अतिशय शिस्तप्रीयतेने हि कार्यशाळा संपन्न करण्यात आली. यामध्ये समारोपात नायब तहसीलदार श्री.कावळे साहेब , नायब तहसीलदार श्री. नालट साहेब, तालुका स्वस्त धान्य पुरवठा अधिकारी श्री. बोराडे साहेब या सर्वांनी सर्व सर्पमित्र वनिता बोराडे यांचे आभार व्यक्त करीत आमच्या पर्यावरणीय, वन्यजीव कायदेशीर ज्ञानात नवीन भर पडल्याची भावना कृतज्ञतेने बोलून दाखविली. कार्यशाळेची सुरुवात आणि समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
![]() |




Comments
Post a Comment