आपत्ती व्यवस्थापनांतर्गत सर्प विषयक शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या मार्गदर्शनात संपन्न

...

राज्य उत्पादन शुल्क कार्यालय बुलढाणा येथे जिल्हा अधीक्षक मा.श्री.पराग नवलकर साहेब यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्पमित्र वनिता बोराडे यांची सर्प माहिती शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.यामध्ये जगातील पहिल्या महिला सर्परक्षक वनिताताई बोराडे यांचे स्वागत सौ.नवलकर मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर प्रास्ताविक रा.उ.शु. श्री.टेकाळे साहेब यांनी केले. सर्पमित्र वनिता बोराडे यांचा सारांश परिचय तथा कार्यवृत्तांत सर्पमित्र डि.भास्कर यांनी उपस्थितांना करून दिला.

     या कार्यशाळेमध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972/75 आणि सुधारित वन्यजीव संरक्षण प्राणीछळ प्रतिबंधात्मक कायदा 2002 संदर्भाने उपस्थित प्रशिक्षणार्थी आधिकारि, कर्मचारी वृदांचे माहिती देऊन अंमलबजावणीसाठी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण करण्यात आले. यामध्ये सर्पमित्र वनिता बोराडे यांनी वन्यजीव व साप यांची सविस्तर माहिती दिली. विषारी,बिनविषारी सापांची ओळख कशी करावी,अचानक घर, परिसर व अंगणात साप आल्यास प्रतिबंधात्मक उपाय योजना काय करावी व कोणती दक्षता घ्यावी सुरक्षित साप कसा पकडावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.सर्पदंश प्रथमोपचार आणि उपचार कसे करावेत याचेही प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रशिक्षणार्थाच्या मनातील भीती घालविण्यासाठी त्यांच्या सर्प विषयक भ्रामक कल्पना व शंकाकुशंकाचे शास्त्रीय वैज्ञानिक उत्तरे देऊन निरसन केले. सापांची भीती नाहिशी करून प्रिती वाढविण्यासाठी या कार्यशाळेने प्रशिक्षणार्थ्याच्या ज्ञानात मोलाची भर घातली.अशी प्रतिक्रिया जिल्हा अधीक्षक (रा. उ. शु.) बुलडाणा जिल्ह्या, मा. श्री. पराग नवलकर साहेब यांनी व्यक्त केली. कार्यशाळेचा समारोप सर्पमित्र डि.भास्कर यांच्या '' लेक वाचवा लेक शिकवा '' या नारी शक्ती सन्मान गीताने करण्यात आला.









Comments

Popular posts from this blog

Lady Snake Rescuer who Rescued 75000 snake whitout any fees..Let's meet Vanita....know about her life ‼️

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय || निसर्गसंवर्धनाच्या दिशेने एक सशक्त जनजागृती चळवळ

सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या नवसंशोधनाने सर्पदंशमृत्यूचा धोका संपणार….!!