वन्यजीव सप्ताह निमित्त दिल्ली येथे राष्ट्रीय परिषदे मध्ये सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या सर्पजनजागृती कार्यशाळेचे आयोजन.
गांधी जयंतीच्या शुभ औचीत्यावर २ ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर वन्यजीव साप्ताह संपूर्ण भारत भर साजरा केल्या जातो, यावर्षी साप व वन्यजीव यांच्या जनजागृती करिता सोयरे वनचरे फौंडेशन ने जन जागृती अभियान संपूर्ण देश पातळीवर राबविले याचाच एक भाग म्हणून गांधी जयंतीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या राजघाट नवी दिल्ली येथील समाधीस्थाळी नतमस्तक होऊन पुढे फरीदाबाद येथे या अभियानाची भव्य आंतराष्ट्रीय परिषदेच्या कार्यक्रमात प्रबोधन करून सांगता करण्यात आली, जगातील पहिल्या महिला सर्प रक्षक वनिता बोराडे यांचा भव्य सत्कार वर्ल्ड किंग वर्ल्ड रेकॉर्ड युनियन यांचे भारतीय प्रतिनिधी असणाऱ्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे करण्यात आला. या वेळी आयोजित कार्वियशाळेत विविध देशांच्यया प्रतिनिधींनी सहभागी होत सर्पमित्र वनिता बोराडे यांच्याकडून सर्प शिक्षण प्रशिक्षणाचे धडे घेतले सोयरे वनचरे फौंडेशन व केंद्रीय वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे जनजागृती अभियान राबविण्यात आले. या वेळी नेपाल, तीब्बेत, नेदरलैंड, चाइना, थाईलैंड, जापान, इसराइल, इंडोनेशिया, मलेशिया या एशियन कन्ट्रीजच्या प्रतिनिधींनी सापांविषयी रोमांचक प्रत्यक्ष...