Posts

“राज्य शासनाने शालेय शिक्षणात सापांची वैज्ञानिक तथा शास्त्रीय माहितीत समाविष्ट करावी” – वनिता बोराडे (सर्पमित्र / सर्पतज्ञ)

Image
                         जगातील पहिल्या महिला सर्प रक्षक  तथा सर्पतज्ञ वनिता बोराडे यांनी आपल्या सोयरे वनचरे मल्टीपर्पज फौंडेशन द्वारा राज्य शासनाच्या शिक्षण आणि वन विभागाकडे  शालेय शिक्षण अभ्यासक्रमात नवीन पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमात साप आणि वन्यजीव यांची वैज्ञानिक आणि शास्त्रीय माहिती विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी समाविष्ट करावी म्हणून आग्रही मागणीचे निवेदन सादर केले आहे. ही मागणी शासनाने मंजूर करावी म्हणून येत्या ८ डिसेंबर रोजी नागपूर येथे सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सर्व पक्षीय आमदारांनी हा मुद्दा उचलून धरावा म्हणून तसेच आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून विधिमंडळाचे लक्ष वेधावे यासाठी आमदारांकडून तारांकित प्रश्न विचारण्याची नोटीस, प्रश्नाचा मसुदा आणि सविस्तर मुद्देसूद शास्त्रीय – वैज्ञानिक माहितीचा प्रस्ताव, मा.सभापती मोहोदय ! यांना सादर करण्यासाठी सर्व पक्षीय आमदारांना सुफुर्त केला आहे. यामध्ये आमदार भावनाताई गवळी, आमदार अमित झनक, आमदार किरण सरनाईक, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार धीरज लिंगाडे, आ...

आपत्ती व्यवस्थापनांतर्गत सर्प विषयक शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या मार्गदर्शनात संपन्न

Image
... राज्य उत्पादन शुल्क कार्यालय बुलढाणा येथे जिल्हा अधीक्षक मा.श्री.पराग नवलकर साहेब यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्पमित्र वनिता बोराडे यांची सर्प माहिती शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.यामध्ये जगातील पहिल्या महिला सर्परक्षक वनिताताई बोराडे यांचे स्वागत सौ.नवलकर मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर प्रास्ताविक रा.उ.शु. श्री.टेकाळे साहेब यांनी केले. सर्पमित्र वनिता बोराडे यांचा सारांश परिचय तथा कार्यवृत्तांत सर्पमित्र डि.भास्कर यांनी उपस्थितांना करून दिला.      या कार्यशाळेमध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972/75 आणि सुधारित वन्यजीव संरक्षण प्राणीछळ प्रतिबंधात्मक कायदा 2002 संदर्भाने उपस्थित प्रशिक्षणार्थी आधिकारि, कर्मचारी वृदांचे माहिती देऊन अंमलबजावणीसाठी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण करण्यात आले. यामध्ये सर्पमित्र वनिता बोराडे यांनी वन्यजीव व साप यांची सविस्तर माहिती दिली. विषारी,बिनविषारी सापांची ओळख कशी करावी,अचानक घर, परिसर व अंगणात साप आल्यास प्रतिबंधात्मक उपाय योजना काय करावी व कोणती दक्षता घ्यावी सुरक्षित साप कसा पकडावा या...
Image
 
Image
जागतिक महिला दिनाच्या औचीत्यावर महाराष्ट्र टाईमस ने ३६ जिल्हे ३६ सुपरवूमन या नावाने महाराष्ट्रातील कर्तुत्वान महिलांच्या विविध क्षेत्रातील सुपर कामगिरीचा आढावा घेतला आहे. या मालिकेत मातृतीर्थ बुलढाणाची सावित्री जिजाऊ ची धाडसी लेक वनिता बोराडे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या अभिमानास्पद कामगिरीचा कार्यवृतांत आज महाराष्ट्र टाईम्स ने प्रकाशित केला आहे. सर्वांनी वाचवा, बघावा असा गौरवास्पद लेख !!  महाराष्ट्र टाईम्स (२०२५) :- https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/relationships/inspiring-story-first-woman-snake-rescuer-in-the-entire-world/articleshow/118922245.cms

मानव आणि वन्यजीव संघर्ष ! संपुष्टात आणण्यासाठी सर्पमित्र वनिता बोराडेंची प्रबोधन प्रशिक्षण कार्यशाळा तहसील कार्यालय मेहकर येथे संपन्न !

Image
दिनांक १०/०३/२०२५ रोजी, मेहकर  येथे तहसील कार्यालयाच्या प्रशस्त हॉल मध्ये सर्पजनजागरण अभियानांतर्गत वनविभागाच्या सौजन्याने सोयरे वनचरे फौंडेशन द्वारा वन्यजीव कार्यशाळा आयोजित केली असता यामध्ये तहसीलदार मा.श्री.निलेश मडके साहेब व   तहसील कार्यालय मेहकर आणि  उपविभागीय महसूल अधिकारी मा.श्री.जोगी साहेब आणि त्यांचे कार्यालयीन कर्माचारी वृन्द यांनी  सहभाग घेतला   यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही सामावेश होता. सापांबद्दल व वन्यप्राण्यांबद्दल शास्त्रीय वैद्यानिक माहिती देण्यात आली, महाराष्ट्रात एकूण ५२ साप असून त्यातील ४० बिनविषारी तर १२ विषारी आहेत. बिनविषारी सापांपासून आपल्याला  कोणताही धोका नाही, उलट हे साप उंदीर खाऊन शेती व शेतकऱ्यांची मोठी मदत करतात. उंदरांच्या बेसुमार पैदासीवर नियंत्रण आणतात व निसर्गाचा समतोल राखतात. त्यांचे संरक्षण, संवर्धन केले असता आपणास मोठी मदत होते. तर १२ विषारी सापांपैकी ८ साप हे पाणथळ व नदीच्या ठिकाणी किनाऱ्या लगत  राहतात, घनघोर झाडी व जंगल परिसरात राहतात तर केवळ चार च साप मानवी परिसराच्या आजूबाजूला उंदीर, सरडे, पाली आणि बेडूक या आप...

वन्यजीव सप्ताह निमित्त दिल्ली येथे राष्ट्रीय परिषदे मध्ये सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या सर्पजनजागृती कार्यशाळेचे आयोजन.

Image
गांधी जयंतीच्या शुभ औचीत्यावर २ ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर वन्यजीव साप्ताह संपूर्ण भारत भर साजरा केल्या जातो, यावर्षी साप व वन्यजीव यांच्या जनजागृती करिता सोयरे वनचरे फौंडेशन ने जन जागृती अभियान संपूर्ण देश पातळीवर राबविले याचाच एक भाग म्हणून गांधी जयंतीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या राजघाट नवी दिल्ली येथील समाधीस्थाळी नतमस्तक होऊन पुढे फरीदाबाद येथे या अभियानाची भव्य आंतराष्ट्रीय परिषदेच्या कार्यक्रमात प्रबोधन करून सांगता करण्यात आली, जगातील पहिल्या महिला सर्प रक्षक वनिता बोराडे यांचा भव्य सत्कार वर्ल्ड किंग वर्ल्ड रेकॉर्ड युनियन यांचे भारतीय प्रतिनिधी असणाऱ्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे करण्यात आला. या वेळी आयोजित कार्वियशाळेत विविध देशांच्यया प्रतिनिधींनी सहभागी होत सर्पमित्र वनिता बोराडे यांच्याकडून सर्प शिक्षण प्रशिक्षणाचे धडे घेतले सोयरे वनचरे फौंडेशन व केंद्रीय वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे जनजागृती अभियान राबविण्यात आले. या वेळी नेपाल, तीब्बेत, नेदरलैंड, चाइना, थाईलैंड, जापान, इसराइल, इंडोनेशिया, मलेशिया या एशियन कन्ट्रीजच्या प्रतिनिधींनी सापांविषयी रोमांचक प्रत्यक्ष...

नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर सर्पमित्र वनिता बोराडे यांची सर्प माहितीचे वैज्ञानिक कार्यशाळा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय घाटबोरी येथे संपन्न

Image
आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिन आणि नागपंचमी चा शुभदिन असा पवित्र योग जुळून आला, याच्या औचीत्यावर सर्पमित्र वनिता बोराडे यांनी सर्प माहितीची वैज्ञानिक कार्यशाळा घाटबोरी येथे आयोजित केली असता या कार्यशाळेत वन कर्मचाऱ्यांचे शिक्षण प्रशिक्षण केले. यामध्ये सापांची अनेक रहस्य रहस्य उलगडून दाखविली. सापांची भीती आणि अंधश्रद्धा घालविण्यासाठी प्रशिक्षानार्थ्यांचे वैज्ञानिक प्रबोधन करण्यात आले दुपारी १ वाजता पासून सुरु झालेल्या या कार्यशाळेत वन कर्मचारी, वन रक्षक आणि वनपाल यांनी व वन परिक्षेत्र अधिकारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. याप्रसंगी माजी बुलढाणा जि.प.अध्यक्ष आदिवासी नेते तथा युवक कॉंग्रेस चे युवा नेते श्री.भास्करराव ठाकरे आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या आदिवासी महिला सरचिटणीस सौ.नंदिनी तारपे, आदिवासी नेते श्री. राजु तारपे व त्यांच्या आदिवासी बांधवांनी हि या कार्यशाळेचा लाभ घेतला. या सर्प कार्यशाळेचे अआयोजन वानापारीक्षेत्र अधिकारी श्री अंकुश येवले साहेब व मेहकर वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.प्रकश सावळे साहेब यांनी जिल्हा उपवन संरक्षक श्रीमती सरोज गवस या...

सर्पमित्र वानिता बोराडे यांची शेतकरी प्रबोधनासाठी जिल्हा स्तरीय कृषी महोत्सव मेहकर येथे सर्प शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न...

Image
सोयरे वनचरे प्रतिष्ठान द्वारे सर्प शिक्षण-प्रशिक्षण कार्यशाळा राबवून "साप शेतकऱ्यांचा शत्रू नसून मित्र आहे" हा संदेश जिल्हा स्तरीय कृषी महोत्सवातून उपस्थितांना समजाविण्यासाठी सर्प शिक्षण-प्रशिक्षण कार्यशाळा आयोजीत करून सर्पमित्र वनिता बोराडे यांनी सापांची उपयुक्तता प्रत्याक्षिके सादर कारून सर्वांच्या निदर्शनास आणून दिली विषारी बिनविषारी साप कसे ओळखावेत, साप चावला असता काय उपाय करावेत, आपल्या आजूबाजूला साप येऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी, हे अगदी सहजतेने शेतकऱ्यांना समजावून सांगितले. सापबाद्दलची भीती नाहीशी होऊन, प्रिती वाढावी यासाठी शेतकऱ्यांना साप हातात देऊन त्याची वैद्यानिक माहिती हि दिली.                                           खासदार मा.ना.श्री.प्रताप्रावजी जाधव यांनी सुद्धा सापांचा स्पर्श अनुभवला तसेच मा.श्री.माधवरावजी जाधाव सभापती कृ.उ.बा.समिता मेहकर यांनी हि सापांना हाताळले व आपल्या मनातील भीती दूर केली मेहकर विधानसभा मतदार संघाचे चे लोकप्रिय आमदार...

"वन आणि वनिता बोराडे" हे वातावरणाशी व वन्यप्राण्यांशी समरस असणारे समीकरण !!

Image
भारत भूमी हि वन वैभवाने नटली असून नद्या, पर्वत, लेण्या, गड, किल्ले, नयनरम्य ऐतेहासिक पर्यटन स्थळे व धार्मिक स्थळे आणि वास्तुकलेचा जागतिक वारसा असणारी मंदिरे भारतीय संस्कृती ही वनसंस्कृती आहे. राम आणि कृष्ण हे अवतारी महापुरुष सुद्धा मानवी जीवनाचे धडे गिरवण्यासाठी व्यास, वाल्मिकी आणि सांदीपाणी  ऋषींच्या आश्रमात वनात    वास्तव्यास गेले कारण ऋषी-मुनी व संतांनी सूक्षम चिंतनातून वन्यप्राणी व मानवप्राणी याच्या सुसंबद्ध सहचाराची व परस्पर समृद्धीसाठी आवश्यक असलेली समन्वय व सृजनशील जीवनप्रणाली विकसित केली जे आधुनिक जगातातील प्रत्येक मानवासाठी कल्याणकारी आहे. हि जीवनप्रणाली म्हणजेच मानवाची सभ्यता आणि संस्कृती आहे. मानवाच्या अती हव्यासामुळे वन्यप्राणी आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून फक्त मानव केंद्रित समृद्ध जीवन हे निसर्गनियमांचे उल्लंघन करणारे असल्याने वन्यप्राणी व मानव यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. प्राचीनकाळी असे नव्हते, तर प्रत्येक भारतीय पूज्य देवी देवतांसोबत कोणता ना कोणता प्राणी असायचा आणि त्या प्राण्याला तेवढेच महत्त्व होते जेवढे त्या देवतांना महत्त्व असायचे जसे क...

सर्पमित्र वनिता बोराडे महाराष्ट्र जनगौरव पुरस्काराने महामहीम राज्यपाल श्री.रमेश बैस यांच्या हस्ते सन्मानित

Image
  मेहकर येथील सर्पमित्र वनिता बोरडे यांचा सन्मान करताना राज्यपाल रमेश बैस. सोबत उपस्थित सुबोध सावजी,डॉ. राहुल सावजी दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी राजभवन मुंबई येथे महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या शुभहस्ते समाजामध्ये विविध क्षेत्रात आदर्श कामगिरी करणाऱ्या निवडक समाजसेवकांना महाराष्ट्र जनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी केले असून संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर राहुल सुबोध सावजी यांनी आपल्या मातोश्री सपना सावजी यांच्या स्मरणार्थ वडील माजी राज्यमंत्री सुबोध भाऊ सावजी यांचा समाजसेवेचा वारसा सातत्याने सुरू ठेवण्यासाठी आपण या कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्याचे सांगितले. माजी राज्यमंत्री सुबोध भाऊ सावजी यांनी सामाजिक ऋण फेडण्याच्या भावनेतून गोरगरिबांची सेवा करून त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी राजकारणा सोबतच आपण सामाजिक सेवेचा वारसा जोपासत असल्याचे आवर्जून सांगितले शैलेश सुबोध सावजी व संपूर्ण सावजी परिवाराने या सत्कार समारंभात आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत व अभिनंदन केले कार्यक्रमाच्या मुख्य प्रबोधन पर भा...

विश्वविक्रमी सर्पस्नेही वनिता बोराडे

Image
ही वनिता रणरागिणी, शक्तिरुपिणी, मातृरुपिणी   रचली सर्परक्षणाची जिने विश्वविक्रमी कहाणी ज्यांनी आपल्या शब्दकोशातून भिती हा शब्द हद्दपार केलाय, साहस, धाडस, निडरता आणि भूतदया ही आभूषणे धारण केली आहेत अशा दुर्लभ व्यक्तिमत्वाच्या धनी आहेत वनिताताई बोराडे. बालपणी बुलढाणा जिल्ह्यात आदिवासींच्या सानिध्यात एखाद्या वनबालेसारखे निसर्गस्नेही जीवन जगल्याने आणि कुटुंबातील वारकरी संप्रदायाच्या वातावरणामुळे 'भूतदया परमो धर्माचे ' बीज नकळत रुजलेले. त्यातून निर्माण झालेला वनिताताईंच्या कर्तृत्वाचा विशाल वटवृक्ष आज आपणास बघायला मिळतो. या वटवृक्षाने सर्प प्रजातींना जीवनदान देऊन त्यांच्यावर स्नेहछाया धरण्यासच आपले जीवन समर्पित केले आहे. आपल्या कामावरील निष्ठा, प्रेम, आस्था यामुळे त्यांनी इतिहास घडविला. ' साप ' शब्द जरी ऐकला तरी भीती जाणवते. प्रत्यक्ष समोर दिसल्यावर तर भल्या भल्यांची बोबडी वळते; तिथे वनिताताईंचा सहज वावर असतो. पुरुषांचेच क्षेत्र समजल्या जाणाऱ्या ' सर्पमित्र ' या प्रांतात त्यांनी अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली आणि विश्वात आपल्या कर्तबगारीने देशाचाही नावलौकीक वाढवला....

सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या नवसंशोधनाने सर्पदंशमृत्यूचा धोका संपणार….!!

Image
सर्पमित्र वनिता बोराडे करणार सर्पदंशमृत्यूचे भय जगातून दूर! भारतामध्ये दरवर्षी अडीच लाख ते साडे सात लाख लोक (2.5 ते 7.5 %) केवळ सर्पदंशामुळे मुत्युमुखी पडतात. सापांविषयीची भिती, अंधश्रद्धा, गैरसमजुती तसेच वैज्ञानिक माहितींचा अभाव व उपचार साधन सामुग्रीची अत्यल्पता प्रतिबंधात्मक व प्रथमोपचारात्मक बाबींचा प्रचार प्रसार लोकाभिमुख न झाल्याने हे सर्पदंश मुत्युचे प्रमाण जागतिक तुलनेत भारतात सर्वाधिक आहे. आपल्या देशात जगातील सर्वात जास्त बिनविषारी साप आढळतात. तरी सुद्धा केवळ अज्ञानामुळे व पारंपारिक आणि गावठी उपचारामुळे लोक दवाखान्यात जाऊन वैद्यकिय उपचार घेताना काही प्रमाणातच दिसून येतात. धार्मिक व घरगुती उपचारात अतिविलंब झाल्याने दवाखान्यात दाखल झालेले रुग्ण डॉक्टरांना उपचार करुन वाचविणे शक्य होत नाही. या हतबल परिस्थितीमुळे नुसता साप दिसताक्षणी लोकांना दरदरुन घाम फुटतो आणि प्रचंड भीतीमुळे जिवाचा थरकाप होतो.सुईच्या टोकाप्रमाणे तीक्ष्ण दात आणि पाण्याच्या थेंबाप्रमाणे असणारे विष हे हत्तीसारख्या प्राण्यांचाही तडकाफडकी जीव घेते, तिथे मानवाची काय गोष्ट! विषारी सर्पदंश म्हणजे साक्षात मुत्यू !! यमा...

बहादुरी को बनाया अपना आभूषण

Image
  बहादुरी को बनाया अपना आभूषण - सर्पमित्र महिला वनीता बोराड़े से डॉ. दर्शनी प्रिय का साक्षात्कार वन्य प्राणी, जंगल, पशु-पक्षी, पर्यावरण के जीवन संजीवनी है। वन का वैभव वन्य पशुओ से ही शोभायमान होता है। चाहे सरीसृप हो, चौपाया या मांसभक्षी प्रकृति की सुंदरता में वे समग्र तत्व रूप में अपनी भूमिका का निर्वहन करते है। इनकी वजह से जीवन चक्र को दीर्घकालिक रूप से न केवल ऊर्वरा बनाने में मदद मिलती है। अपितु जीवन पर यथास्थिति बनाये रखने में भी सहायता मिलती है। सदियों से इस ग्रह का आस्तित्व जीव-जन्तुओ के बूते ही सुरक्षित रहा है। इसमें पशु संरक्षकों और वन्य जीव प्रेमियों की बड़ी भूमिका है। महाराष्ट्र की एक ऐसी ही सर्पमित्र महिला अपने कार्यों से न केवल दूसरों के लिए नजीर बन रहीं हैं अपितु वन्य प्राणियों को उनके कृत्रिम आवास से निकाल कर उन्हें प्राकृतिक आवास में पहुंचा रही है। प्रायः हमारे समाज में सर्प संरक्षण या उनके रेसक्यू का कार्य समाज के पुरुषों द्वारा किया जाता रहा है क्यांकि ऐसी धारणा है कि ऐसे कार्यों में अतिरिक्त साहस, बहादुरी और आत्मविश्वास की आवश्यकता होती है। महाराष्ट्र के बुलढाणा की ...
बुलढाणा : हजारो सापांना जीवनदान देणाऱ्या सुपर हिरो सर्पमित्र वनिता बोराडे https://www.publicvibe.com/post/1674716257800129538?utm_source=share&utm_medium=android&userid=1674797369428334351 मी स्थानिक बातम्या आणि नोकऱ्यांसाठी पब्लिक वाइब ॲप वापरत आहे.तुम्हीसुद्धा आता ॲप डाउनलोड करा https://mapp.publicvibe.com/jysv/bd86f6f

Female Snake Rescuer in India Rescue and Released 75000 snakes,

Image
Vanita Borade, World's First Woman Snake Rescuer Entire the World.. Read More About her Journey.. Exclusive Article  https://orato.world/2023/01/04/indian-housewife-rescues-and-releases-75000-snakes-into-the-wild/  

Lady Snake Rescuer who Rescued 75000 snake whitout any fees..Let's meet Vanita....know about her life ‼️

Image
When Vanita Jagdeo Borade was 10 years old, she would spend her holidays playing on her father’s farm in the Naigaon Deshmukh village in the Buldana district of Maharashtra. The fields were next to a forest and Vanita was friends with children of the tribals who worked on the farm and lived nearby. With these children, Vanita learned about wildlife including honey extraction from beehives and fishing. Often, their fishing net would trap water snakes along with the fish. But the children fearlessly separated the snakes from the catch and released them back into the water. “I learned that those water snakes were not venomous. I also became comfortable with wildlife in general as we kids caught chameleons and other non-venomous snakes during the monsoons and released them in the wild,” recalls Vanita, now 47.From play to rescue work What began in 1985 as a child’s pastime took a serious turn when Vanita caught a red sand boa (commonly known as do-muha saap) that had entered her house in t...

First Woman Snake Rescuer....Top of 100 World Record Holder's... Vanita Borade

Image
  4th World Record Holder's Meet  One Blood...One World  4th World Record Holder's  On this Grand Ceremony The WorldKings Book Of Records has official Honoured Vanita for being in TOP 100 World Record Holders. Its Very Auspicious Event with Dignitaries and Chief-Editors of World Record Books from 7 countries with the Unique 2500 World Record Holders from 200 countries and the rest of World. Vanita Borade, The First Woman Snake Rescuer Entire the World is the Enviromental Social Worker who serve for Nature and Wildlife Protection, Conservation and Research Work, restlessly free of cost from past 36 years and still continuing it. She has been Nominated for Nobel Peace Prize International award from last 3 years continuously.  The Women and Child Development Ministry has Honoured her with very prestigious award Nari Shakti Puraskar, which was awarded to Vanita by the auspicious hands of His Excellency the ex.President of India Hon. Shri.Ramnath Kovind at Rashtrapat...
Image
दै.लोकमत वाचकप्रियतेचा सुवर्ण महोत्सव कृतज्ञता पर्व म्हणुन साजरा करीत आहे . संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर ही लोकमत आज क्र.1 चे दैनिक म्हणुन आपला नावलौकिक उत्तरोत्तर वृद्धिंगत करीत आहे. दै.लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेयरमैन तथा माजी खासदार विजय दर्डा यांचे शुभ हस्ते 'नारी शक्ती-राष्ट्रपती पुरस्कार' प्राप्त जगातील पहिल्या महिला सर्परक्षक सर्पमित्र वनिता बोराडे यांनी सापांचा व लोकांचा जिव वाचवून 51000 सापांना जीवनदान देण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे तसेच शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांना नामांकन प्राप्त झाले आहे. या कामगिरीने आपल्या देशाच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. राजमाता जिजाऊ च्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याची ही शुरतेजस्वीनी विद्युल्लता आज आपल्या कर्तृत्वाच्या लख्ख प्रकाशाने जग दिपवत आहे. यामुळेच आज त्यांचा लोकमत तर्फे कृतज्ञता पुर्वक बुलडाणा येथील कार्यक्रमात सत्कार करण्यात आला . याप्रसंगी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसोबत मोठ्याप्रमाणात पत्रकार बांधव आणि लोकमतचे वार्ताहर व विक्रेतेही उपस्थित होते.